पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर्थिक मदतीनंतर सलमानकडून रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मजुरांना धान्यपुरवठा

सलमान खान

चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्या  २५ हजार कामगारांना आर्थिक मदत पुरवल्यानंतर सलमान आता रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबीयांनादेखील अन्न धान्य  पुरवत आहे. सलमानचे मित्र आणि काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी ही माहिती दिली.

चीन विकसनशील देश तर मग आम्हालाही तोच दर्जा द्या - डोनाल्ड ट्रम्प

कोरोनामुळे ज्या लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे अशा कुटुंबीयांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी सलमान खान प्रयत्न करत आहे. ' गरजूंना मदत करण्यासाठी तू नेहमीच इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असतो' असं, कौतुकही बाबा सिद्दीकी यांनी ट्विटरवर केलं आहे. यापूर्वी सलमान खाननं २५ हजार लोकांना आर्थिक सहाय्य केलं.  बीईंग ह्यूमन या त्याच्या स्वयंसेवी संस्थेद्वारे मनोरंजन विश्वात  रोजंदारीवर काम करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्यात आलं होतं. 

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा १, ६६६ वर, मुंबईत ७२ नवे रुग्ण

याव्यतिरिक्त सलमाननं राधे या चित्रपटासाठी काम करणाऱ्या क्रू मेंबरच्या खात्यातही पैसे जमा केले आहे. सलमानचा आगामी चित्रपट 'राधे युअर मोस्ट वाँटेड भाई'चं चित्रीकरण २६ मार्च ते २ एप्रिल या काळात होणार होतं. चित्रीकरणाचं वेळापत्रक फार पूर्वीच ठरलं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे चित्रीकरण झालं नाही. पण सलमाननं २६ मार्च ते २ एप्रिल या काळातील  क्रू मेंबरचं मानधन त्यांच्या खात्यात जमा केलं होतं.