पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इंशाअल्लाह'मध्ये सलमान दिसणार या भूमिकेत

सलमान खान आलिया भट्ट

संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट 'इंशाअल्लाह' चर्चेत आला तो या चित्रपटातील स्टारकास्टमुळे. या चित्रपटात  आलिया भट्ट आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या वयामध्ये  खूपच अंतर आहे. त्यामुळे वयाचं अंतर पाहता  ही जोडी नेमकी पडद्यावर  कशी दिसेन याचं कुतूहल तमाम चाहत्यांना आहे. या चित्रपटात सलमानची भूमिका नेमकी  काय असणार हे उघड झालं आहे. 

केवळ १२ तासांसाठी करिनाची लंडन ते मुंबईवारी

सलमान  या चित्रपटात फ्लोरिडास्थित एका व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे. सलमान 'इंशाअल्लाह'मध्ये ४० वर्षांच्या व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसेन अशी माहिती  मुंबई मिररनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. तर आलिया ही गंगेच्या काठी राहणाऱ्या एका विशीतल्या तरूणीची भूमिका साकारत आहे. 

'तो' मुस्लिम असल्यानं वडिलांकडून मला मारहाण, हृतिकच्या बहिणीचा आरोप

सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भन्साळी जागेच्या शोधात आहे.  या चित्रपटाचं काही चित्रीकरण फ्लोरिडामध्ये होत असल्यानं भन्साळी एका  चांगल्या जागेच्या शोधात असल्याचं समजत आहे. हा चित्रपट २०२० साली ईदला प्रदर्शित होत आहे.