पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाईजानचा दिलदारपणा, चित्रीकरण बंद असलं तरी 'राधे'च्या क्रू मेंबरला दिले पैसे

अभिनेता सलमान खान

बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांनं चित्रपटसृष्टीत  रोजंदारीवर काम करणाऱ्या २५ हजार लोकांना आर्थिक सहाय्य केलं आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वानं १९  मार्चपासून चित्रीकरण बंद ठेवलं आहे. मालिका, चित्रपट जाहीरात ,वेबसीरिज यांमधील मुख्य कलाकारांबरोबरच इथे लाखो लोक हे  रोजंदारीवर काम करत असतात. या लोकांना दरदिवशी कामाचे पैसे दिले जातात. मात्र चित्रीकरण बंद असल्यानं त्यांचे हाल झाले आहेत. अशातच सलमाननं राधे या चित्रपटासाठी काम करणाऱ्या क्रू मेंबरच्या खात्यातही पैसे जमा केले आहे.

रामायण ठरली २०१५ नंतर हिंदीतील सर्वाधिक रेटिंग असलेली मालिका

समलानचा आगामी चित्रपट 'राधे युअर मोस्ट वाँटेड भाई'चं चित्रीकरण २६ मार्च ते २ एप्रिल या काळात होणार होतं. चित्रीकरणाचं वेळापत्रक फार पूर्वीच ठरलं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे चित्रीकरण झालं नाही. पण सलमाननं २६ मार्च ते २ एप्रिल या काळातील  क्रू मेंबरचं मानधन त्यांच्या खात्यात जमा केलं आहे अशी माहिती स्पॉट बॉय ईनं दिली आहे. सलमान सध्या पनवेलमध्ये आहे.  त्याचा 'राधे युअर मोस्ट वाँटेड भाई' हा ईदला प्रदर्शित होणार आहे.

कोरोनाशी लढा : मुंबई, दिल्लीसाठी शाहरुखकडून अशी केली जाणार मदत