पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अनेकजण नवऱ्याला सोडतात पण प्रियांकानं भारत सोडला'

सलमान खान प्रियांका चोप्रा

भाईजानच्या लेखी चुकीला कधीच माफी नसते हे एव्हाना ग्लोबल  स्टार प्रियांकाच्या लक्षात आलंच असेल. सध्या सलमान  'भारत' चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या प्रमोशनमध्ये प्रियांकाला ट्रोल करणं हे ओघानं आलंच. गेल्या काही महिन्यांपासून सलमाननं 'भारत' चित्रपटाचा विषय निघाला की प्रियांका चोप्रावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र याच सलमाननं प्रियांकानं चित्रपटाच्या प्रमोशनचा  भाग व्हावं अशी अपेक्षा ठेवायला सुरूवात केलीये. 

प्रियांका चोप्राला  चित्रपटाची कथा खूपच आवडली. ती या कथेच्या प्रेमात होती त्यामुळे तिनं चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी व्हायला आता काहीच हरकत नाही, असं सलमान 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला.

प्रियांकावर सतत  टीका  करणाऱ्या सलमानचा मात्र आता नूरच पालटला आहे. 'प्रियांकानं आयुष्यभर खूप मेहनत केली. तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा चित्रपट मिळाला होता. मात्र तिनं चित्रपटाला  ठोकर मारली आणि लग्न केलं. अनेकदा लोक यासाठी  नवऱ्याला सोडतील मात्र प्रियांकानं भारत (चित्रपट) सोडला. यासाठी तिचं  खरंच कौतुक',  असं सलमान म्हणाला.