पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमान म्हणतो ब्रेकअपनंतरही मैत्री राहू शकते

सलमान खान

अभिनेता सलमान खाननं  'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोची निर्मिती केली आहे. मात्र या शोची निर्मिती करताना सलमाननं या शोला नवा ट्विस्ट दिला आहे.  सलमाननं इतक्या वर्षांपासून  सुरू असलेल्या शोच्या मूळ संकल्पनेत बदल केला आहे. या शोमध्ये खऱ्या आयुष्यातील जोड्या  सहभागी होतात. मात्र सलमाननं यावेळी पूर्वाश्रमीच्या जोडप्यांनाही छोट्या पडद्यावर आणलं आहे. 

अमेयनं स्टाईलकडे अधिक लक्ष द्यावं, 'गर्लफ्रेंड' सईचा सल्ला

साधरण ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या एक्ससोबत काम करणारे खूपच कमी कलाकार आहेत. पण सलमाननं यातल्या  काही एक्स कपल्सना या शोच्या निमित्तानं एकत्र आणलं. ब्रेकअपनंतरही आपण  आपल्या एक्स सोबत  मैत्री कायम ठेवू शकतो असं सलमाननं मानतो. 

#NotMyDeepika हॅशटॅग वापरून चाहते दीपिकाला करत आहेत विनंती

'नच बलिये' च्या नव्या सिझनमध्ये एक्स कपल्सनां एकत्र आणण्यामागचं कारण  सलमानला विचारण्यात आलं होतं, यावर सलमाननं उत्तर दिलं आहे. 'काही वेळा दोन व्यक्ती काही कारणानं आयुष्यात एकत्र येत नाही, मात्र अशा व्यक्तीनं एकत्र येऊन काम करायला काहीच हरकत नाही. एका  मुला- मुलीत ब्रेकअपनंतरही चांगली मैत्री राहू शकते. मात्र हे त्यांच्यावर  अवलंबून आहे' असं सलमान म्हणाला.