पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काळवीट शिकार प्रकरण: सुनावणी दरम्यान सलमान गैरहजर

सलमान खान

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूर कोर्टाने शुक्रवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र सलमान आज सुनावणी दरम्यान हजर राहिला नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी १९ डिसेंबर रोजी होणार आहे. मागच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने जर सलमान खानने कोर्टासमोर हजेरी लावली नाही तर त्यांचा जामीन रद्द केला जाईल असे सांगितले होते. मात्र आज सुनावणी पूर्वी सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनी सलमान खान सुनावणीला येणार नसल्याचे सांगितले. 

शरद पवार दुपारी ईडी कार्यालयात जाणार; दक्षिण मुंबईत जमावबंदी लागू

जोधपूरमध्ये काळवीट शिकार प्रकरणी सलमानला आज जोधपूर कोर्टामध्ये हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्याने सुनावणीला हजेरी लावली नाही. दरम्यान, याप्रकरणी ४ जुलै रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सलमान कोर्टासमोर हजर झाला नव्हता. त्यामुळे न्यायाधीश चंद्र कुमार सोंगार यांनी सांगितले होते की, '२७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणी दरम्यान सलमान हजर राहिला नाही तर त्याचा जामीन रद्द केला जाईल.' त्यामुळे सलमान खान आज सुनावणी दरम्यान कोर्टात हजर राहिल असे म्हटले जात होते. मात्र तो सुनावणीला आला नाही. 

'माफ करा साहेब! यावेळी तुमचे ऐकणार नाही'

याप्रकरणी सलमान खान कोर्टामध्ये हजर राहण्याच्या सात दिवस आधी त्याला सोशल मीडियाच्या माध्यामातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. लॉरेंस बिश्नोईने या गँगशी जोडलेल्या 'सोपू' संघटनेच्या फेसबुक पेजवरुन गॅरी शूटर नावाच्या एका तरुणाने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकी देणाऱ्या तरुणाने सलमानचा फोटो टाकत त्याला लाल रंगाने क्रॉस मार्क केले आहे. सोपू संघटनाच्या कायद्याने तुला मृत्यूची शिक्षा सुनावली असल्याचे या तरुणाने म्हटले होते. 

पुण्यातील ५ तालुक्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर