पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हृदयविकाराचा झटका आलेल्या 'दबंग'मधल्या सहकाऱ्याची सलमान घेतोय काळजी

सलमान खान

सलमान खानसोबत 'दबंग' सीरिजमध्ये काम करणारे कलाकार दद्दी पांडे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही बाब सलमान खानला समजताच त्यांनं दद्दी यांची काळजी घेण्यासाठी आपल्या टीममधल्या सदस्याला पाचारण केलं आहे. त्याचप्रमाणे सलमान स्वत:  त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहे.

'तारक मेहता..'मध्ये दिशाची जागा घेण्याबद्दल विभूती म्हणते..

दद्दी यांनी सलमान सोबत 'दबंग', 'दबंग २' मध्ये काम केलं आहे.  ते 'दबंग ३ ' मध्येही हवालदाराची भूमिका साकारत आहेत. त्यांना नुकताच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी ते सेटवर नव्हते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दद्दी सध्या गोरेगाव इथल्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

मलायका- अर्जुननं घेतली ऋषी कपूर यांची भेट

सलमानला  त्यांच्या तब्येतीविषयी कळताच त्यानं दद्दी यांची काळजी घेण्यासाठी टीममधल्या सदस्याला पाठवलं आहे. तसेच तो  स्वत: दद्दी यांची विचारपूस करत आहेत. यापूर्वी अनेकदा सलमान बॉलिवूडमधल्या अनेक छोट्या मोठ्या कलाकारांच्या मदतीला अडचणीच्या काळात धावून गेला आहे.