पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानच्या मते त्याच्यासह हे पाच आहेत बॉलिवूडचे सुपरस्टार

सलमान खान

अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे यात वादच नाही. सलमाननं वयाची पंन्नाशी ओलांडली आहे. बॉलिवूडमधलं त्याचं करिअर हे दोन दशकाहूनही अधिक आहे. सलमाननंतर अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आले  मात्र सलमानची जादू आजही तशीच आहे. कलाकाराला  लोकप्रियता जशी मिळते तशीच ती लवकर निघूनही जाते, ही लोकप्रियता, ही प्रसिद्धी दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवणं ही खरी कसरत असल्याचं सलमान म्हणतो. 

सलमानच्या मते सध्याच्या घडीला त्याच्यासह शाहरूख खान, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगन हे पाच सुपरस्टार आहेत. मात्र प्रत्येक कलाकाराची लोकप्रियता काही  काळानंतर संपते असं सलमान म्हणतो. 'ही लोकप्रियता दीर्घकाळापर्यंत टिकवणं हिच खरी कसरत आहे. मी, शाहरूख, आमिर, अक्षय आणि अजयनं लोकप्रियता दीर्घकाळ टिकवून ठेवली आहे. पण एक काळ येतो जेव्हा तुमच्या चित्रपटाच्या कमाईत  घट व्हायला सुरूवात होते, मात्र आमचा हा काळ अजूनही सुरू व्हायचा आहे.' असं सलमान फ्लिमफेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. 

सलमानचा 'भारत' हा चित्रपट गेल्याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं जवळपास १५० कोटींहून अधिकची कमाई केली. या वर्षांची सलमानची सुरुवात चांगली झाली असली तरी २०१८ साली सलमान खान, शाहरूख खान आणि आमिरचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला होता.