पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या खलनायकावर सल्लू मियॉ मेहरबान! गिफ्ट केली चक्क BMW कार

सलमान खान

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा दबंग ३ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारलेल्या किच्चा सुदीपवर खुश होऊन सलामानने त्याला एक खास भेटवस्तू दिली आहे.  सलमानने त्याला बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून दिली आहे. सलमान स्वत: ही गाडी घेऊन किच्चाच्या घरी पोहोचला आणि त्याला आश्चर्याचा धक्का दिला.

 

...म्हणून एप्रिलमध्ये हनिमूनला जाण्याचा नेहा- शार्दुलचा निर्णय

किच्चा सुदीपने इन्स्टाग्रामवर सलमान खानने दिलेल्या खास भेटवस्तूचे फोटो शेअर करत सलमानचे कौतुक केले आहे. सलमानने दिलेल्या  बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून मजा करतानाचे काही फोटो त्याने इन्स्टावर शेअर केले आहेत. या पोस्टवर किच्चाने असे म्हटले आहे की, 'जर तुम्ही चांगले केले तर तुमच्यासोबत चांगलेच होते. या ओळींना खरे करत सलमानसर बीएमडब्ल्यू एम ५ कार घेऊन माझ्या घरी आले. ही सुंदर भेटवस्तू दिल्याबद्दल आणि मला आणि माझ्या कुटुंबाला खूप प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद सर. तुमच्यासोबत काम करणे हा सन्मान आहे आणि तुम्ही आमच्या घरी आलात त्याबद्दल धन्यवाद.', अशी भावनिक पोस्ट किच्चा सुदीपने लिहिली आहे. 

VIDEO : वेश पालटून दीपिका मुंबईतल्या रस्त्यावर फिरली आणि....

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या बीएमडब्ल्यू कारची किंमत जवळपास १. ७ कोटी एवढी आहे. याआधी सलमान खानने किच्चाला आपले जॅकेट सुध्दा भेट म्हणून दिले होते. किच्चा सुदीप दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिध्द अभिनेता आहे. दबंग ३ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 

''अश्विनी एकबोटेंनी दिलेले वचन अर्धवटच राहिले''