पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारत'ची २०० कोटींच्या दिशेनं घोडदौड सुरू

कतरिना कैैफ

सलमान खान,  कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या  'भारत'ची आता २०० कोटींच्या दिशेनं घोडदौड सुरू झाली आहे. या चित्रपटानं आतापर्यंत १७९ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. या आठवड्याअखेरीस चित्रपटानं २०० कोटी कमावले तर हा एक  विक्रमच ठरेन.

बिग बॉस मराठी २ : बिग बॉस शिवानीला पाठवणार का घरी ?

सलमानचा   'भारत' ५ जूनला म्हणजे ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी  ४५ कोटींची कमाई  करून चित्रपटानं विक्रम रचला. पण त्याचसोबत प्री बुकिंगमधूनही २४ कोटींची विक्रमी कमाई चित्रपटानं केली. वर्ल्ड कपचा फिव्हर असूनही चित्रपटानं चांगली कमाई केली होती. या आठवड्यात पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चित्रपटाची कमाई संथगतीनं सुरू आहे. 

Mission Mangal vs Saaho : प्रभास आणि अक्षयमध्ये टक्कर अटळ

 सध्या 'भारत'नं १७९.६ कोटींची कमाई केली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला चित्रपटाच्या कमाईत ५५% ची घट झाली आहे. मात्र या आठवड्या अखेरीस हा चित्रपट २०० कोटींचा गल्ला पार करेन असंही  म्हटलं जात आहे.  सलमानचा  'भारत' हा चित्रपट 'ओडे टु माय फादर' या कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे.