पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रदर्शनापूर्वीच 'भारत'नं केला विक्रम

भारत

ईद आणि सलमानचे चित्रपट हे समीकरण फार पूर्वीपासूनच चालत आलं आहे.  ईदच्या  दिवशी सलमानचे चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी असते. ईदच्या दिवशी देशातील ४७०० स्क्रीन्सवर भारत प्रदर्शित झाला. या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच नवा विक्रम स्थापित केला आहे. 
प्रदर्शनापूर्वीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून सर्वाधिक कमाई  करणाऱ्या सहा चित्रपटांच्या यादीत आत भारत चित्रपटाचाही समावेश झाला आहे.  बॉक्सऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून भारतानं २४ कोटींची कमाई केली आहे. 

तरच 'भारत'मध्ये काम करेन, कतरिनानं ठेवली होती अट

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट पाहू
- एप्रिल महिन्यात भारतात प्रदर्शित झालेल्या अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमनं अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून सर्वाधिक कमाई केली  होती. या चित्रपटानं ४९. ६२ कोटी  कमावले होते. 
-अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बाहुबली द कनक्ल्यूजन हा दाक्षिणात्य चित्रपट होता. या चित्रपटानं ३७. ५३ कोटी हे केवळ अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले होते.
- तिसऱ्या क्रमांकावर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला इन्फिनिटी वॉर हा हॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटानं  अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून २९.१४ कोटी कमावले. 
- चौथ्या क्रमांकावर ठग्ज ऑफ हिंदोस्थान  हा चित्रपट आहे. आमिर खान, अमिताभ बच्च्न, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांची भूमिका असलेला ठग्ज ऑफ हिंदोस्थान  छोट्या पडद्यावर चांगलाच आदळला. मात्र अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून  या चित्रपटानं २६. २७ कोटींची कमाई केली होती. 
- सलमानच्या टायगर झिंदा हैनं अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून  २४. ७६ कोटींची कमाई केली.