पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सहाव्या दिवशी 'भारत'च्या कमाईत ५५% ची घट

भारत

सलमान खान, कतरिना कैफची प्रमुख भूमिका असलेला 'भारत' चित्रपट गेल्या आठवड्यात ५ जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटानं  बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.  अल्पावधित कमाईचे अनेक विक्रम सलमानच्या भारतनं रचले. अवघ्या पाच दिवसांत १५० कोटींची कमाई चित्रपटानं केली. मात्र सहाव्या दिवशी चित्रपटाच्या  कमाईत एकूण ५५% ची घट झाली आहे.

  बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार सोमवारी म्हणजे सहाव्या दिवशीचं चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे ९ ते १० कोटींच्या घरात होतं. रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा वर्ल्डकप सामना असूनही चित्रपटानं २७.९० कोटींची कमाई केली. मात्र  दुसऱ्या आठवड्याच्या सुरूवातीला ही कमाई निम्म्यावर आली. दुसऱ्या आठवड्यातील  'भारत'ची सुरूवात ही काहीशी संथ झाली असली तरी या आठवड्याअखेरीस हा चित्रपट २०० कोटींचा टप्पा सहज पार करेन असा अंदाज आहे.  

भारतची एकूण कमाई
पहिला दिवस - ४२.३० कोटी 
दुसरा दिवस -  ३१ कोटी
तिसरा दिवस- २२.२० कोटी
चौथा दिवस - २६.७० कोटी 
पाचवा दिवस- २७.९० कोटी  

सलमाननं पाच दिवसांत १५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला  आहे. पण त्याचबरोबर २०१९ मधला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमही या चित्रपटानं  आपल्या नावे केला आहे. याव्यतिरिक्त प्री बुकिंगमधून सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमही या चित्रपटानं केला आहे.