पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानला भेटण्यासाठी तो ६०० किलोमीटर सायकल चालवत आला

सलमानला भेटण्यासाठी तो ६०० किलोमीटर सायकल चालवत आला

आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते  काय करतील याचा नेम नाही. सलमान खानला भेटण्यासाठी त्याचा चाहता चक्क ६०० किलोमीटर सायकल चालवत गुवाहटीला  पोहोचला.  

पुण्यातील 'सविता भाभी'च्या पोस्टरमागे, अश्लील उद्योग मित्रमंडळ?

भुपेन लिक्सन असं या ५२ वर्षीय चाहत्याचं नाव आहे. ते सायकलिस्ट देखील आहे. मुळचा तिनसुखीयाचा रहिवाशी असलेल्या भुपेन यांनी ८ फेब्रुवारीला आपल्या प्रवासाला  सुरुवात केली. १३ फेब्रुवारीला ते गुवाहटीत पोहोचले. सलमान खान फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी गुवाहटीत आहे. १५ फेब्रुवारीला  फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.  

'प्रत्येक चित्रपटात तुझ्यासोबत रोमान्स करण्याची संधी मिळाली असती तर'

सलमान यासाठी गुवाहटीत आला असल्याची खबर मिळताच भुपेन  आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी इथे आले. भुपेन यांच्या नावे एक अनोखा विक्रम देखील आहे. हँडलला न हात लावता ६० मिनिटे ४८ किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम त्यांच्या नावे  आहे.

'सासूबाईं'ना जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्याकडून कामाची पोचपावती