पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक

सलमान खान

बॉलिवूडचा 'सुलतान' सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी जोधपूर येथील पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. सलमान खानला फेसबुकवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

आदित्य ठाकरे 'कोट्यधीश', जाणून घ्या संपत्ती

जोधपूरमधील चौपासनी पोलिसांनी गाडी चोरी करुन पळ काढणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करताना त्यांनी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे उघड झाले आहे. आरोपींची ओळख जॅकी बिन्शोई नावाने झाली आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिलेला फोटो त्याचा मोबाईलमध्ये आढळून आला. अटक केलेले दोन्ही तरुण सोपू संघटनेशी जोडलेले आहेत. 

रोहितनं मागे टाकला सर डॉन ब्रॅडम यांचा विक्रम

चौपासनी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी प्रविण आचार्य यांनी सांगितले की, 'याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली असता त्यांनी फक्त लोकप्रियतेसाठी हे कृत्य केले असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपी कार चोरी आणि अंमली पदार्थांची विक्री करतात. एका कारची चोरी करुन पळत असताना पोलिसांनी त्यांना चेकपोस्टजवळ अडवले होते. त्याची चौकशी केल्यावर हा प्रकार उघड झाला' 

नितेश राणेंनी भाजपमध्ये केला प्रवेश; उमेदवारीवर झाले शिक्कामोर्तब