पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विसर्जन मिरवणुकीत सलमानचा हटके डान्स!, व्हिडिओ व्हायरल

सलमान खान

मुंबईमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या घरी गणपती विराजमान होत असतो. या कलाकारांकडून मोठ्या भक्तिभावाने गणपतीची सेवा केली जाते. याच कलाकारांमध्ये अभिनेता सलमान खानचाही समावेश होतो. यंदा सलमान खानची बहिण अर्पिता हिच्या घरी गणपती बसविण्यात आला होता. दीड दिवसाच्या या गणपतीचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. पण विसर्जन मिरवणुकीत सलमान खानने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकदम हटके अंदाजात सलमान खान या मिरवणुकीत नाचताना दिसतो आहे.

अर्पिताच्या घरातून मिरवणूक निघाल्यावर सलमान खान याच्यासोबत स्वरा भास्कर, डेजी शहा हे सुद्धा नाचत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. सलमान खान एकदम मोकळेपणाने ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरताना या व्हिडिओत दिसते. गणपती बाप्पाची आरती सलमान खान याने केली. यावेळी त्याच्यासोबत त्याचा भाच्चाही होता.

अनेकांनी सलमान खान याच्या नाचण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. त्याला अनेक चाहत्यांनी लाईकही केले आहे.