पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानची रणबीरला टक्कर, एकाच दिवशी प्रदर्शित होणार 'दबंग ३' आणि 'ब्रह्मास्त्र'

दबंग ३

बॉलिवूडमध्ये २०१९-२० मध्ये अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हे चित्रपट आघाडीच्या कलाकारांचे असणार आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या अखेरीस सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्या चित्रपटांमध्ये  टक्कर पाहायला मिळणार आहे. 

सलमाननं नुकतीच 'दबंग ३' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला  प्रदर्शित होणार आहे. तर  आयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची तारीख ही पूर्वीच जाहीर करण्यात आली होती. हा चित्रपटही २० डिसेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. 'ब्रह्मास्त्र' मध्ये आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. या दोन्ही चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत.  हे दोन्ही चित्रपट बिग बजेट चित्रपट आहेत जर ते एकाच दिवशी प्रदर्शित झाले तर एका चित्रपटाच्या कमाईवर याचा  परिणाम होऊ शकतो हे नक्की. 

त्यामुळे कोणता चित्रपट प्रदर्शनाची तारीख मागे घेतो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे अजय देवगणचा 'तानाजी' आणि दीपिका पादुकोनचा 'छपाक' हा चित्रपटही एकाच दिवशी प्रदर्शित होत आहे. याव्यतिरिक्त सलमानचा भारत आणि अक्षय कुमारचा सुर्यवंशी याचित्रपटांमध्येही टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रोहित शेट्टी 'सुर्यवंशी' हा चित्रपट ईदला प्रदर्शित करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे २०१९-२० वर्षांत अनेक मोठे चित्रपट एकमेकांना धडकणार हे नक्की.