पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दबंग ३ : रविवारी तुफान कमाई अन् सोमवारी कमालीची घट

दबंग ३

सलमान  खानची प्रमुख भूमिका असलेला 'दबंग ३' चित्रपट  गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं तुफान कमाई केली. एकीकडे देशभरात आंदोलनं सुरु आहेत त्यामुळे साहजिक चित्रपटाच्या कमाईवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र पहिल्या आठवड्यात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. पण दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईचं गणित पुरतं गडबडलं. सोमवारी  चित्रपटाच्या कमाईत कमालीची घट झालेली पहायला मिळाली. 

'दबंग ३'च्या टीमनं साजरा केला सई मांजरेकरचा वाढदिवस, आई झाली भावूक

बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार चित्रपटानं सोमवारी ९ ते १० कोटींची कमाई केली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमाईत ५५ ते ६० % पर्यंतची घट पहायला मिळाली. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार चित्रपटानं  पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी २४.५० कोटी, शनिवारी २४.७५ कोटी आणि रविवारी ३१.९० कोटींची कमाई केली. मात्र सोमवारी  कमाईत घट झालेली पहायला मिळाली. 

सीएसएमटी स्थानकातील तिकीट घरात कंगना रेल्वे प्रवाशांच्या सेवेत

२५ डिसेंबर पासून नाताळाच्या सुट्ट्या सुरु होत आहे, त्यामुळे चित्रपटाच्या कमाईला याचा फायदा होईल अशी  शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच आठवड्यात अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजित दोसांज, किआरा अडवाणीची प्रमुख भूमख भूमिका असलेला 'गुड न्यूज'ही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सलमानच्या 'दबंग ३' पुढे या चित्रपटाचं  मोठं आवाहन असणार आहे.