पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दबंग ३' ठरला १०० कोटींची कमाई करणारा सलमानचा १५ वा चित्रपट

दबंग ३

सलमान खानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार हे गणित जणू ठरलेलंच आहे. सलमानच्या अनेक चित्रपटांनी  १०० कोटींच नाहीतर २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला  'दबंग ३' हा १०० कोटींहून अधिक गल्ला जमवलेला  पंधरावा चित्रपट ठरला आहे. 

'ढिशूम'चा सीक्वल येणार

या चित्रपटानं ५ दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची पहिल्या पाच दिवसांतली एकूण कमाई ही १०३. ८५ कोटी आहे.  'दबंग ३' हा 'दंबग'चा प्रीक्वल आहे. या चित्रपटातून महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर हिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.  देशातील सुधारित नागरिकत्त्व कायद्यावरून ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. मुख्यत: हिंदी चित्रपटाची सर्वाधिक कमाई ही मुंबई, दिल्ली  सारख्या शहरांत होते. दिल्ली गेले काही दिवस आंदोलनांनी धुमसत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या  कमाईचं गणित बिघडेल अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवली होती. मात्र तरीही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद चित्रपटाला मिळाला आहे. 

एकता कपूरनं नवोदित दिग्दर्शकाला भेट दिली आलिशान कार

यापूर्वी सलमानच्या किक, एक था टायगर,  टायगर झिंदा है, रेस ३, भारत, बजरंगी भाईजान यांसारख्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.