पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिद्धार्थच्या विजयामुळे सलमान नाराज, 'बिग बॉस' सोडणार?

सलमान 'बिग बॉस' सोडणार?

बिग बॉस शो हा सलमानशिवाय अपूर्ण आहे. सलमान आपल्या हटके सुत्रसंचालनाच्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतो. या शोसाठी सर्वाधिक मानधन सलमान खान घेतो. मात्र सलमान यापुढे 'बिग बॉस'चं सुत्रसंचालन करणार नाही असं समजत आहे. 

'फर्जंद' च्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते अनिरबान यांचा 'ऋणानुबंध'

सलमान खान सिद्धार्थ शुक्लाच्या विजयामुळे नाराज आहे, वाहिनीनं भेदभाव केला आणि सिद्धार्थला नेहमीच पाठिंबा  दिला असं सलमानला वाटतं आहे, वाहिनीनं सिद्धार्थला बिग बॉस १३ चा विजेता घोषीत केल्यामुळे सलमान खान नाराज आहे. यामुळे फिनालेच्या चित्रीकरणालाही उशीर झाला.  यापुढे बिग बॉसच्या कोणत्याही सिझनचा  मी भाग होणार नाही, असंही सलमाननं स्पष्ट केल्याचं  पिंक व्हिलानं सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं. 

कंगनाच्या 'तेजस'चा फर्स्ट लूक समोर

बिग बॉस १३  हा  सुरु झाल्यापासून वादात सापडला होता. या शोवर बंदी घालण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. १३ वा सिझन संपला आहे. सिद्धार्थ शुक्लाला या सिझनचा विजेता घोषीत करण्यात आलं आहे, मात्र  अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. याचवरुन सलमानही नाराज असल्याचं समजत आहे.