पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लग्नाच्या ५-६ दिवस आधी सलमाननं मोडलं लग्न'

सलमान खान

सलमान आणि त्याचं लग्न हा नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असतो. सलमाननं वयाची पंन्नाशी ओलांडली आहे. तरीही लग्नाचा प्रश्न आजतागयत त्याचा पिश्चा पुरवत आहे. सलमानचा दीर्घकाळापासून मित्र असलेला साजिद नाडियाडवालानं सलमानच्या लग्नावरुन मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. 

'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात

'द कपिल शर्मा शो'मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी  हाऊसफुलच्या टीमसोबत साजिद नाडियाडवालाही आले होते. यावेळी सलमानच्या लग्नावरून  साजिद यांना कपिलनं छेडले.  तेव्हा सलमान आणि साजिद एकाच दिवशी लग्न करणार अशी चर्चा होती. यावर साजिद म्हणाले 'सलमानला १९९९ साली लग्न करण्याचा झटका आला होता.  त्यानं मुलगीही पाहिली होती. मी आणि  सलमाननं त्याच्या वडिलांच्या वाढदिवशी लग्नही करायचं ठरवलं होतं. सगळं काही जुळून आलं होतं. तयारी झाली होती. पत्रिका  वाटल्या. मात्र लग्नाला पाच  सहा दिवस बाकी असताना सलमाननं नकार दिला. माझी इच्छा नाही असं तो म्हणाला. मी मात्र लग्न केलं' असं मजेशीर उत्तर साजिद यांनी दिलं.

प्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर