पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीआरपीच्या यादीत वादग्रस्त 'बिग बॉस १३' पडला मागे

बिग बॉस १३

वाद आणि टीआरपी हे समीकरण मनोरंजन विश्वात तसं खूपच जूने. वाद असला की टीआरपी वाढतो अशी एकंदर समजूत असते. गेल्या काही  दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला 'बिग बॉस १३' या शो कडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे असंच दिसतंय. टीआरपीच्या यादीत या शोची घसरण झाली आहे. 

गोविंदाच्या पत्नीला नको होती 'सपना', कृष्णा एपिसोडमधून गायब

BARC च्या सर्वाधिक टीआरपी असलेल्या दहा मालिकांच्या यादीत या शोला स्थान मिळवता आले नाही. टॉप १० च्या यादीतून 'बिग बॉस १३' बाहेर फेकला गेला आहे. या शो विरोधात प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा शो बंद करण्याची मागणी विविध संस्थेनं केली आहे. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्रही  लिहिण्यात आलं होतं. 

अमरीश पुरी यांचा नातू करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

शोचा सुत्रसंचालक असलेल्या सलमानच्या घराभोवती याच कारणामुळे आंदोलनही करण्यात आलं होतं. या सर्वांचा परिणाम म्हणून प्रेक्षकांनी या शोकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. 'बिग बॉस १३' टीआरपीच्या यादीत मागे पडला आहे. तर कौन बनेगा करोडपती, द कपिल शर्मा शो हे टीआरपीच्या यादीत वरचढ ठरले आहेत.