पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानच्या 'भारत'ची १०० कोटींपर्यंत पोहोचण्याची रेस

भारत

ईदला 'भारत' चित्रपट प्रदर्शित झाला. देशातल्या ४२०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अर्थात सलमानचा चित्रपट असल्यानं चाहत्यांचा तुफान प्रतिसाद या चित्रपटाला लाभला असून आता १०० कोटींच्या दिशेनं चित्रपटाची घौडदौड सुरू झाली आहे. या विकेंडपर्यंत १०० कोटींची  शर्यत 'भारत' सहज पार करेन असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

पहिल्या दिवशी या चित्रपटानं ४२. ३० कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं ३१ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटानं ७३.३० कोटींचा गल्ला जमवला आहे. आठवड्याअखेरपर्यंत हा चित्रपट १०० कोटींची कमाई सहज करेन  असं म्हटलं जात आहे. 

यापूर्वी प्री बुकिंगमधून सलमानच्या 'भारत'नं २४ कोटींची कमाई केली. प्री बुकिंगमधून सर्वाधिक कमाई करणारा हा आतापर्यंतचा सहावा चित्रपट ठरला आहे. तर पहिल्यादिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या २०१९ मधल्या चित्रपटांच्या यादीतही 'भारत' पहिल्या क्रमांकावर आहे. 
सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर,  तब्बू, जॅकी श्रॉफ यांची भूमिका असलेला हा चित्रपट कोरियन चित्रपट 'अॅन ओडे टु माय फादर' या चित्रपटावर आधारलेला आहे.