पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारत'ची कमाई २०० कोटींच्या घरात

भारत

सलमानच्या 'भारत'नं अखेर २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटानं २०० कोटींचा गल्ला पार केला आहे. ५ जूनला देशभरात 'भारत' प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी 'भारत'नं विक्रमी कमाई केली. प्री बुकिंगमधूनही चित्रपटानं २४ कोटींची कमाई केली. मात्र दुसऱ्या आठवड्यात 'भारत'ची कमाई संथगतीनं सुरू झाली. पहिल्या आठवड्यात चित्रपटानं १८० कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट सहज २०० कोटींचा गल्ला जमवेल अशा शक्यता  वर्तवण्यात आल्या होत्या. मात्र या शक्यता प्रत्यक्षात उतरण्यासाठी तिसरा आठवडा उजाडावा लागला.

सलमान म्हणजे 'कागदी वाघ', गायिका सोना महापत्राची टीका

पहिल्या आठवड्यात दमदार कमाई करणारा 'भारत'  मात्र दुसऱ्या आठवड्यात फारशी कमाई करू शकला नाही. दुसऱ्या आठवड्यात 'भारत'च्या कमाईत ५० % ची घट झाली. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार  दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं २१.८१ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची एकूण कमाई ही २०१. ८६ कोटी झाली आहे.

वयानं मोठ्या असलेल्या सलमानच्या आईची भूमिका साकारण्याविषयी सोनाली म्हणते...
 

२०१९ मधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हा विकी कौशलचा 'उरी द सर्जिकल स्ट्राईक्स' हा आहे. विकी कौशलच्या चित्रपटाचा हा रेकॉर्ड सलमानचा चित्रपट मोडणार का हे पाहण्यासारखं ठरेन. सलमानचा 'भारत'  चित्रपट कोरियन चित्रपट 'ओडे टु माय फादर'  या चित्रपटावर आधारलेला आहे. या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त दिशा पटानी, कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर, सोनाली कुलकर्णी, तब्बू यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत.