पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रमोशनमधून वेळ काढत मेकअप मनच्या मुलाच्या लग्नात सलमानची उपस्थिती

सलमान खान

अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी 'दबंग ३' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नाताळात त्याचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र प्रमोशनच्या व्यग्र वेळापत्रकातूनही वेळ काढत सलमान खान आपल्या मेकअप मन राजू नागच्या मुलाच्या लग्नात उपस्थित राहिला. 

चालकाच्या लग्नासाठी रविनाची कुटुंबीयांसोबत उपस्थिती

राजू हे गेल्या पंचवीस वर्षांपासून सलमानसोबत काम करत आहेत. अनेक चित्रपटांसाठी राजू यांनी सलमानचा मेकअप मन म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे राजू यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहून सलमाननं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

सलमानची उपस्थिती पाहून वधू- वरही खूश होते. सलमानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दीपिकाला मागे टाकत आलिया ठरली आशियातील Sexiest Woman!