पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: 25 वर्षानंतर माधुरी-सलमानचा ‘पहला-पहला प्यार है’ गाण्यावर डान्स

सलमान खान आणि माधुरी दीक्षित

बॉलिवूड सुपरस्टार सलमना खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा 'हम आपके है कौन' हा चित्रपट 90 च्या दशकातील सुपरहीट चित्रपटांपैकी एक आहे. आज या चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लिबर्टी सिनेमा येथे चित्रपटाचे स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी सलमान खान, माधुरी दीक्षितसह चित्रपटाची संपूर्ण टीमने हजेरी लावली. दरम्यान, चाहते आणि टीममधील सगळ्यां कलाकारांच्या आग्रहाखातर सलमान आणि माधुरीने ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटातील सुपरहीट गाणं ‘पहला-पहला प्यार है’ वर डान्स केला.

इंडियन आयडलच्या 'या' स्पर्धकासोबत जोडले नेहा कक्करचे नाव

दरम्यान, सलमान खान आणि माधुरी दीक्षितच्या रोमँटिंग डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दोघेही या गाण्यावर पुन्हा एकदा डान्स करताना खूप उत्साही दिसत आहेत. माधुरी दीक्षितने चित्रपटाच्या स्कीनिंगवेळी काळ्या रंगाची साडी नेसली होती. तर सलमान खानने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची जिन्स घातली होती. 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावले

'हम आपके है कौन' चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शक, मोहनिश बहल, अभनेता बिंदूसह संपूर्ण टीम उपस्थित होती. या चित्रपटाच्या चाहत्यांनी देखील या कार्यक्रमा दरम्यान चित्रपटातील गाण्यांवर डान्स केला. अभिनेत्री रेणुका शहाणे पती आशुतोष राणासह या कार्यक्रमाला आली होती. दोघे ही खूप सुंदर दिसत होते. 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, 'भोंगा' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा