पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इन्शाअल्लाह' पुढच्या ईदला रुपेरी पडद्यावर सलमान-आलियाची जोडी

आलिया - सलमान

गेल्या काही वर्षांपासून ईद आणि सलमान खान हे समिकरण ठरलंच आहे. सलमान दरवर्षी ईदला आपले चित्रपट प्रदर्शित करतो. या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही लाभतो. ५ जून म्हणजे ईदच्या दिवशी सलमानचा 'भारत' चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी  संजय लीला भन्साळी यांनी सलमानच्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. त्यामुळे  आता  २०२० मधल्या ईदला 'इन्शाअल्लाह' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

प्रियाच्या त्या दृश्यावर LGBTQIA+ समाजाची ही होती प्रतिक्रिया
 

'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटानंतर जवळपास १ दशकानंतर सलमान आणि संजय लीला भन्साळी ही जोडी एकत्र काम करत आहे. भन्साळी 'इन्शाअल्लाह' चं दिग्दर्शक करणार आहेत. तब्बल १९ वर्षांनंतर ही जोडी एकत्र काम करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे आलिया आणि सलमान खान हे दोघंही पहिल्यांदाच चित्रपटात काम करणार आहेत. या जोडीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक  आहेत.

मिस युनिव्हर्ससाठी माझ्याऐवजी ऐश्वर्याला पाठवण्याचा होता प्रस्ताव, सुष्मितानं सांगितला किस्सा 

सलमाननं आलिया भट्टच्या कामाचं खूपच कौतुक केलं. आलिया ही प्रामाणिक आणि सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे असं कौतुक सलमाननं केलं होतं. तर २०२० मध्ये ईदच्या दिवशी रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. मात्र 'सूर्यवंशी' च्या प्रदर्शनाची तारिख अधिकृतरित्या अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही.