पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलिया- सलमानच्या 'इंशाअल्लाह'च्या चित्रीकरणाचा शुभारंभ ऑगस्टमध्ये

सलमान आलिया

संजय लीला भन्साळी यांचा 'इंशाअल्लाह' चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे.  या चित्रपटात  आलिया भट्ट आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑगस्टमध्ये सुरूवात होणार आहे. १५ ऑगस्टनंतर 'इंशाअल्लाह'चं चित्रीकरण सुरू होणार आहे, चित्रपटातील  काही भाग हा मुंबईत चित्रीत करण्यात येणार आहे. त्यानंतर ऋषीकेश, वाराणसी, हरिद्वार आणि अमेरिकेत  चित्रीकरण होणार आहे. 

पिपिंगमुनच्या वृत्तानुसार चित्रीकरण १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान सुरू होणार आहे. हा चित्रपट २०२० साली ईदला प्रदर्शित होत आहे. काही महिन्यांपूर्वी संजय लीला भन्साळी यांनी 'इंशाअल्लाह'ची घोषणा केली.

बॉक्स ऑफिसवर श्रद्धा विरुद्ध श्रद्धा, 'छिछोरे' आणि 'साहो' एकाच दिवशी होणार प्रदर्शित

सलमान आणि आलियातील वयाचं अंतर पाहता ही जोडी नेमकी पडद्यावर  कशी दिसेन याचं कुतूहल तमाम चाहत्यांना आहेच. या चित्रपटात सलमानची भूमिका नेमकी  काय असणार हे गेल्याच महिन्यात उघड झालं होतं. 

सलमान  या चित्रपटात फ्लोरिडास्थित एका व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे. सलमान 'इंशाअल्लाह'मध्ये ४० वर्षांच्या व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसेन अशी माहिती  मुंबई मिररनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. तर आलिया ही गंगेच्या काठी राहणाऱ्या एका विशीतल्या तरूणीची भूमिका साकारत आहे. 

ये तोहफा हमने खुद को दिया है !, कंगनानं घेतली आलिशान कार

पिंक व्हिला या संकेतस्थळानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार यात आणखी एक अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र तिसरी अभिनेत्री कोण आहे हे गुलदस्त्यात आहे.