पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमान म्हणतो मुलं हवीत पण....

सलमान खान

अभिनेता सलमान  खानचं लग्न  हा नेहमीच बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय असतो. सलमान  कधी  लग्न करणार असा प्रश्न वयाची पंन्नाशी ओलांडलेल्या सलमानला वारंवार चाहते विचारतात. सलमानच्या लग्नाचा विषय  मागे पडला तरी तो  शाहरूख, करण जोहर, आमिर आणि इतर सेलिब्रिटींच्या पावलांवर पाऊल ठेवत सरोगसीद्वारे मूल स्वीकारणार असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर सलमाननं मिश्कील उत्तर दिलं आहे. 

सलमानचा प्रियांकावरचा राग जाता जाईना
'मला मुलं तर हवी आहेत पण मुलं म्हटलं की आई आलीच. मुलांना जरी आईची गरज असली तरी मला मात्र मुलांची आई नकोय', असं सलमान म्हणाला. माझ्याकडे मुलांची काळजी घेणारे बरेच लोक आहे त्यामुळे यातून मी नक्की  मार्ग काढेन असं सलमान म्हणाला. 

विवेकच्या 'त्या' ट्विटवर सलमान खान म्हणतो...

सलमान गेल्या २० वर्षांहूनही अधिक काळ बॉलिवूडमध्ये आहे.  सलमानसोबत या इण्डस्ट्रीत पाऊल ठेवणाऱ्या त्याच्या अनेक सहकलाकारांनी लग्न केलीत.  त्यांना मुलंही आहेत. मात्र सलमान बिनलग्नाचा राहिला. या काळात सलमानचं नाव कित्येक अभिनेत्रींशी जोडलं, अलीकडच्या काळातील कतरिना कैफ, लुलिया वंतूर सारख्या अभिनेत्रींसोबतही सलमानचं नाव जोडलं मात्र सलमान काही लग्नाचं मनावर घ्यायला तयार नाही.