पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानला पहिला चित्रपट माझ्यामुळे मिळाला- जॅकी श्रॉफ

सलमान खान जॅकी श्रॉफ

बॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते  जॅकी श्रॉफ आणि  सलमान खान ही जोडी 'भारत' चित्रपटात एकत्र पाहायला मिळाली. 'भारत' चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. सलमान आणि जॅकी यांच्यातील नातं हे सहकलाकारांपलीकडचं आहे. सलमान माझ्यासाठी मुलासारखाच आहे, असं जॅकी म्हणतात. हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना जॅकी यांनी सलमानच्या  सुरूवातीच्या काळाबद्दल एक आठवण सांगितली. सलमानला बॉलिवूड चित्रपटात पहिली संधी ही माझ्यामुळे मिळाली असं जॅकी अभिमाननं सांगतात. 

बिग बॉस मराठी २ : अभिजित बिचुकलेंविरोधातील तक्रार मागे

'सलमान माझ्यासाठी मुलासारखा आहे आणि हे नातं कायमस्वरूपी असंच राहणार आहे. १९८८ मध्ये सलमान फलक चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. मी त्याची सुभाष घई आणि इतर दिग्दर्शकांकडे शिफारस केली होती. त्याचे फोटो घेऊन मी अनेक दिग्दर्शकांकडे गेलो आहे. या मेहनतीचं फळ म्हणून त्याला बिवी हो तो ऐसी या चित्रपटात काम करण्याची पहिली  संधी मिळाली. माझ्या बद्दल त्याच्या मनात खूपच आदर आहे.''  तो मला बघतच मोठा झाला असल्याचं जॅकी म्हणाले. 

वयानं मोठ्या असलेल्या सलमानच्या आईची भूमिका साकारण्याविषयी सोनाली म्हणते...

सलमान आणि जॅकी श्रॉफ यांचा 'भारत'  चित्रपट ५ जूनला प्रदर्शित झाला. हा चित्रपट कोरिअन चित्रपट 'ओडे टु माय फादर' चित्रपटावर आधारित आहे. या  चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे.