पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘वेडिंगचा शिनेमा’नंतर सलील कुलकर्णींचा ‘एकदा काय झालं’ हा नवा चित्रपट

एकदा काय झालं

‘वेडिंगचा शिनेमा’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या प्रख्यात संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सलील कुलकर्णी यांनी त्यांचा दुसरा मराठी चित्रपट ‘एकदा काय झालं’चे पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे.

'वेडिंगचा शिनेमा’ला भारतात आणि परदेशांतसुद्धा रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळला. हे यश ताजे असतानाच ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर झळकले आणि रसिकांची उत्सुकता पुन्हा एकदा वाढली.

वयाच्या ५२ व्या वर्षीही तरुण दिसण्यामागच रहस्य सांगतोय अक्षय

गजवदन प्रॉडक्शन्स आणि शो बॉक्स एंटरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच सलील कुलकर्णी ‘एकदा काय झालं’मध्येही लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार या विविधांगी भूमिकेत रसिकांसमोर येणार असून २०२०च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

ऐश्वर्यावरील वादग्रस्त मीम्सनंतर पहिल्यांदाच विवेक-अभिषेक आमने-सामने

पारंपारिक रितीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणारा चित्रपट म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’चे कौतुक झाले. मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, शिवराज वायचळ , ऋचा इनामदार या कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे होते. या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केल्याची प्रतिक्रिया समीक्षक आणि प्रेक्षकांमध्ये उमटली होती. त्यामुळेच ‘एकदा काय झालं’बद्दलही रसिकांमध्ये आत्ताच उत्कंठा निर्माण झाली आहे.