पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सायना नेहवालच्या बायोपिकमधला परिणीतीचा पहिला लूक पाहिलात का?

परिणीती चोप्रा

 बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या बायोपिकमध्ये परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत आहे.  चित्रपटातील परिणीतीचा पहिला लूक शेअर करत सायनानं तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

दयाबेन परतली? सोशल मीडियावर मालिकेच्या व्हिडीओची जोरदार चर्चा

११ ऑक्टोबरपासून बायोपिकच्या चित्रिकरणाला सुरूवात होत आहे.  सायनानं याचा फोटो शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. सायना या बायोपिकसाठी खूपच उत्सुक आहे, तर परिणीती मात्र थोडी दबावात आहे. मनातील चलबिचल परिणीतीनं यापूर्वीही बोलून दाखवली. 

या चित्रपटासाठी माझ्या नावाचा विचार केला ही माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे. या चित्रपटासाठी माझ्यावर खूप मेहनत घेण्यात आली आहे. सर्वोत्तम प्रशिक्षकांकडून मला  प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सायना कशी खेळते, ती कोणाविरोधात खेळली आहे, सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास केला आहे. आता या सर्व गोष्टी उत्तमपणे मला रुपेरी पडद्यावर मांडायच्या आहेत अशी भावना परिणीतीनं व्यक्त केली आहे. 

'इफ्फी'मध्ये इंडियन पॅनोरमासाठी पाच मराठी चित्रपटांची निवड

यापूर्वी अभिनेत्री श्रद्धा कपूरची निवड चित्रपटासाठी करण्यात आली होती. श्रद्धानं हा चित्रपट सोडल्यानंतर परिणीतीची वर्णी चित्रपटात लागली.