पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Laal Kaptaan : राखेतून जन्मलेला 'लाल कप्नाट'

लाल कप्टान

अभिनेता सैफी अली खानच्या 'लाल कप्नाट' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं  आहे. या चित्रपटात सैफ आतापर्यंत न पाहिलेल्या एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे. या चित्रपटात सैफ नागा साधूची भूमिका साकारत आहे.  सुरूवातीला या चित्रपटांचं नाव 'हंटर' होतं मात्र हे नाव बदलून 'लाल कप्नाट' करण्यात आलं. 

'राखेतून जन्मला, राख होण्यासाठी',  अशी हटके  ओळ देत सैफच्या  लूकचं प्रमोशन  करण्यात आलं.  सैफ उत्तम अभिनेता आहे. या चित्रपटातून त्याला  अभिनयाचं कबस दाखवण्याची एक वेगळी संधी मिळणार आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेला सैफ या चित्रपटातून पहायला  मिळणार आहे.  यापूर्वी  असा चित्रपट कधीही तयार करण्यात आला नव्हता असं  इरॉसचे व्यवस्थापकिय संचालक  सुनील लुल्ला म्हणाले. 

नवदीप सिंग या चित्रपटाचं दिग्दर्शन  करणार आहेत. या चित्रपटाचं काही चित्रीकरण  राजस्थानमध्ये करण्यात  आलं. लाल कप्टानच्या सेटवरचे काही फोटो  सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात सैफ पायरट्स ऑफ करेबिअनचा हिरो  जॉनी डेपसारखा दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. 

६ सप्टेंबरला  हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सैफ या चित्रपटाबरोबरच 'सेक्रेड गेम्स' सिझन २ चं देखील चित्रीकरण  करत  आहेत. सैफच्या चाहत्यांमध्ये 'सेक्रेड गेम्स'  आणि  'लाल कप्टान' या दोघांविषयी कमालीची उत्सुकता आहे.