सैफ अली खान आणि करिना कपूरचा चिमुकला तैमूर हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. तैमूर या नावामुळे अनेक लोक या चिमुकल्याचा रागही करतात. क्वचितच एखाद्या स्टारकिडला इतकी लोकप्रियता आणि द्वेष एकत्र अनुभवायला मिळाली असेल. सैफ आणि करिनानं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानंतर त्यावेळी सोशल मीडियावर अनेकांनी चीड व्यक्त केली होती. या नावाला बहुतांश लोकांचा विरोध होता. हे नाव जुलमी शासक तैमूर वरून ठेवलं असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र अरबाज खानच्या चॅटशोमध्ये आलेल्या सैफनं या नावाचा खरा अर्थ सांगितला.
'एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थही होतात. तैमूर हे नाव इतिहासातल्या जुलमी शासक तैमूर वरून ठेवलं नाही. तैमूर या शब्दाचा अर्थ होतो लोह, लोखंड. आम्हाला हा अर्थ आवडला म्हणूनच आम्ही मुलाला हे नाव दिलं.' या नावाचा इतिहासातल्या तैमूरशी संबध नसल्याचं पिंच या चॅटशोमध्ये सैफनं स्पष्ट केलं.
..म्हणून सैफला परत करायचाय पद्मश्री पुरस्कार
तैमूरवर सतत असलेल्या फोटोग्राफरच्या पाळतीवरही सैफनं चिंता व्यक्त केली. 'तैमूर लहान आहे मात्र तो आता मीडिया हा शब्ददेखील उच्चारायला शिकला आहे. कोणी फोटोग्राफर आजूबाजूला दिसले की तो आम्हाला स्वत:हून सांगतो.' सेलिब्रिटींच्या अनेक मुलांना चित्रपटात यायचं असतं पण कधीकधी हे काळजी करण्यासारखंही कारण असल्याचं सैफ म्हणाला.