पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'चित्रपटाच्या कमाईतून हॉटेलला भाडेतत्वावर दिलेलं पतौडी पॅलेस परत मिळवलं'

सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खानला अनेकजण 'छोटे नवाब' म्हणून ओळखतात. सैफचा आलिशान पतौडी पॅलेस हा अनेकदा चर्चेचा विषय असतो. सैफच्या पूर्वजांचा हा आलिशान महाल एका हॉटेल चेनला भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिला होता. हा महाल सैफनं परत मिळवला.

....म्हणून अभिनेत्री दीपिका विकतेय स्वत:चे कपडे

चित्रपटातून जेवढे पैसे कमावले त्याचा वापर करुन  पतौडी पॅलेस परत मिळवला असं सैफ मिडडेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला. वडिलांच्या मृत्यूनंतर एका प्रसिद्ध हॉटेलला पतौडी पॅलेस भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिला होता. त्यातल्या एका पार्टनरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पार्टनरनं माझ्यापुढे प्रस्ताव ठेवला. तू म्हणशील तेव्हा पतौडी पॅलेसचा ताबा तुला देण्यात येईल असं ते म्हणाले होते. मला माझा महाल परत हवा होता. त्यानंतर त्यांनी एक सभा घेतली. पतौडी पॅलेस ते मला परत द्यायला तयार झाले मात्र त्यासाठी भरपूर पैसे द्यावे लागतील अशी अट त्यांनी माझ्यापुढे ठेवली. चित्रपटातून कमावलेल्या पैशांतून मी त्यांच्या मागणीची परतफेड केली, असं सैफ मिड डेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

गरीब मुलांना मदत करतानाचे माझे फोटो काढू नका, जान्हवीची विनंती

सैफनं काही दिवसांपूर्वी पत्नी करिनाचा वाढदिवस पतौडी पॅलेसमध्ये साजरा केला होता.