पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानातून सुटका केलेल्या उज्मावर चित्रपट, सैफ प्रमुख भूमिकेत

सैफ अली खान

'जवानी जानेमन' चित्रपटाच्या चित्रीकरणात सैफ अली खान व्यग्र आहे. या चित्रपटाबरोबरच सैफच्या वाट्याला एक नवा कोरा चित्रपट आला आहे. या चित्रपटात सैफ  भारतीय दूतावासाचे उपायुक्त जेपी सिंह यांच्या भूमिकेत आहेत. 

पाकिस्तानात अडकलेल्या उज्मा अहमद हिच्या पाकिस्तातून भारतात परतण्याच्या  थरारक प्रवासावर चित्रपटाची कथा आधारलेली आहे. उज्मा  अहमद ही मलेशियामध्ये राहत होती. २०१७ मध्ये ती एका पाकिस्तानी चालकाच्या प्रेमात पडली. त्याला भेटण्यासाठी ती त्याच्या घरी पाकिस्तानमध्ये गेली. मात्र तो विवाहित असून त्याला चार मुलं असल्याचं भयानक सत्य तिच्यासमोर आले. पाकिस्तानी चालकाच्या कचाट्यात सापडलेल्या उज्माला बंदुकीचा धाक दाखवून तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडलं होतं. तिथे तिचा छळही केला जायचा.

अब्रूनुकसानीच्या खटल्याप्रकरणी कंगना- रंगोलीला न्यायालयानं बजावले समन्स

अखेर कसाबसा मार्ग काढतं तिनं त्यावेळच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली. तिला परत आणण्यासाठी भारतीय दूतावासाचे उपायुक्त जेपी सिंह यांची मोठी मदत झाली होती. त्यांचीच भूमिका सैफ साकारणार आहे. कहाणी ऐकताच सैफनं चटकन होकार दिला. रितेश शहा या चित्रपटाची कथा लिहिणार आहे. रितेश यांनी 'बाटला हाऊस', 'पिंक', 'मर्दानी' आणि विकी कौशलच्या 'उधम सिंह'साठी कथा लिहिली आहे.