पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून साराला नव्या सिनेमात घेणे सैफने टाळले

सारा अली खान आणि सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खान त्याचा आगामी चित्रपट जवानी दिवानीच्या निर्मितीमध्ये सध्या व्यग्र आहे. या सिनेमामध्ये त्याची मुलगी सारा अली खान ही सुद्धा असेल, असे आधी सांगितले जात होते. पण साराने या सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे. आता या सिनेमाच्या माध्यमातून सारा अली खानऐवजी पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नितीन कक्कड या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. सैफ अली खानचे जुने मित्र जय शेवकरमानी हे सुद्धा या सिनेमाच्या निर्मितीमध्ये आहेत.

जवानी दिवानीसाठी आम्ही एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होतो, असे सैफ अली खानने म्हटले आहे. सारा अली खानही या भूमिकेसाठी चालली असती. पण तिला जर या सिनेमामध्ये घेतले असते, तर ती सध्या जे सिनेमे करते आहे, ते सगळे तिला सोडावे लागले असते, असे सैफ अली खानने सांगितले. त्यासाठीच आम्ही या भूमिकेसाठी सारा अली खानला घेतले नाही. आलिया या भूमिकेसाठी एकदम योग्य असल्याचेही सैफ अली खानने म्हटले आहे. 

सारा सध्या जे सिनेमे करते आहे, ते सर्व तिच्यासाठी योग्यच आहेत. ती योग्य दिशेने प्रवास करते आहे. त्यामुळे तिला या सिनेमासाठी इतर सर्व सिनेमे सोडायला लावणे मला योग्य वाटले नाही, असे सैफ अली खानने म्हटले आहे.