पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ग्लॅमरस भूमिकांमुळे तृप्तीनं नाकारले चित्रपट

तृप्ती तोरडमल

‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटातून अभिनेत्री तृप्ती तोरडमलनं  मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची ती कन्या. या चित्रपटातील तृप्तीच्या अभिनयाची दखल  अनेकांनी घेतली. तिच्या कामाचं कौतुकही करण्यात आलं. चित्रपट प्रदर्शित होऊन  वर्ष उलटले या काळात तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही  आल्या मात्र अधिक ग्लॅमरस भूमिकांमुळे तिने हे चित्रपट नाकारले. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं चित्रपट नाकारल्याची कारणं  सांगितली. 

'मी विचार करूनच निर्णय घेते सविता दामोदर परांजपे नंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या मात्र मला त्या आवडल्या नाही. त्या भूमिकांना तसा अर्थ नव्हता  त्या फक्त ग्लॅमरस होत्या. चित्रपटाच्या आकड्यापेक्षा उत्तम कामावर मला लक्ष केंद्रीत करायचं आहे. कमी चित्रपट वाट्याला आले तरी चालतील मात्र काम, कथा ही उत्तमच असली पाहिजे असं तृप्ती म्हणाली. 

'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटात सुबोध भावे सोबत ती प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली. २०१८ मध्ये  हा चित्रपट प्रदर्शित झाला  होता. आता तृप्ती दिग्पाल लांजेकर यांच्या  'फत्तेशिकस्त' चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी दिग्पाल यांनी फर्जंद चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 'मी फर्जंद चित्रपट पाहिला होता. फर्जंद सारख्या चित्रपटात काम करण्याची माझी  इच्छा होती' आता  हे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचं तृप्ती म्हणाली.