पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Sacred Games 2: या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सेक्रेड गेम्स २

गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या  ‘सेक्रेड गेम्स २’च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. नेटफ्लिक्सवरील वादग्रस्त पण तितकीच लोकप्रिय अशी ही वेबसीरिज होती. या वेबसीरिजचा पहिला सिझन एका निर्णायक वळणावर येऊन थांबला. पुढे काय होणार याची  उत्सुकता सर्वांनाच होती. जवळपास ६ महिन्यांहूनही अधिक काळ प्रेक्षकांची उत्कंठता ताणून धरल्यानंतर अखेर नेटफ्लिक्सनं ‘सेक्रेड गेम्स २’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 

'सेक्रेड गेम्स २’ १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. २६ दिवसांत काय होणार?,  सब मरेंगे सिर्फ त्रिवेदी बचेगा म्हणजे नेमकं काय होणार या सर्व प्रश्नांची उत्तर आता ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये मिळणार आहेत. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर या वेब सीरिजचे कथानक आधारित आहे. 

 ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे संवाद सोशल मीडियावर सुपरहिट ठरले होते. अश्लील आणि तितकेच आक्षेपार्ह  संवाद, दृश्य यामुळे ही सीरिज मोठ्या प्रमाणात वादात सापडली होती मात्र तितकीच ती लोकप्रियही ठरली होती.  सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, जतीन सारना, पंकज त्रिपाठी, कल्की कोचलीन, रणवीर शौरी यांसारखे अनेक कलाकार या सीझनमध्ये पहायला मिळणार आहेत.