पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अशी मिळाली अमृताला 'Sacred Games 2' मध्ये भूमिका

अमृता सुभाष

'नेटफ्लिक्स'ची बहुचर्चित आणि तितकीच वादग्रस्त वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स २’ नुकतीच प्रदर्शित झाली. या वेबसीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्येही अनेक मराठी चेहरे पाहायला मिळाले त्यातला एक आवर्जून लक्षात राहणारा मराठी चेहरा म्हणजे अमृता सुभाष होय. गणेश गायतोंडेची 'ताई', 'रॉ'ची एजंट आणि मुंबई पोलिसांसाठी 'मदर इंडिया'.

अमेय म्हणतो हा नशिबान खेळलेला 'Sacred Games'

अमृता ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं अनेक भूमिका साकारल्या आहेत. या सर्व भूमिकांपेक्षा अर्थात ‘सेक्रेड गेम्स २’मधील कुसुमदेवी यादव ही भूमिका सर्वात वेगळी होती. 

‘सेक्रेड गेम्स' ही वेबसीरिज विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स' या कांदबरीवर आधारित आहे. मात्र या कांदबरीत कुसुमदेवी यादव हे पात्र नव्हतं. महिला रॉ एजंटऐवजी कांदबरीत पुरूष रॉ एजंट होता. मात्र वेबसीरिजच्या लेखकांनी पुरूष रॉ एजंटचं पात्र बदलून त्याजागी महिला रॉ एजंट ही नवी भूमिका आणली.

‘युनिसेफनं सद्भावना दूत पदावरून प्रियांकाला हटवावं'

अमृतानं या भूमिकेसाठी ऑडिशन दिली आणि तिला यात भूमिका मिळाली. सुरूवातीच्या काही भागात कुसुमदेवी यादव म्हणजेच 'ताई' ही सक्षम भूमिकेत दिसली.