'नेटफ्लिक्स'ची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशी ‘सेक्रेड गेम्स २’ ही वेबसीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आली. २०१८ मध्ये या वेबसीरिजचा पहिला सिझन प्रदर्शित झाला होता. एका निर्णायक वळणावर या वेबसीरिजचा पहिला सिझन संपला. पुढे काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच होती मात्र प्रेक्षकांनी जवळपास वर्षभर या सीरिजची वाट पाहिली.
‘युनिसेफनं सद्भावना दूत पदावरून प्रियांकाला हटवावं'
‘सेक्रेड गेम्स २’ मध्ये नवाजुद्दीन, सैफ, पंकज, कलकी यांसारखे बॉलिवूडमधले अनेक चेहरे महत्त्वाच्या भूमिकेत होते. मात्र त्याचबरोबर या सीरिजच्या दुसऱ्या भागामध्येही अनेक मराठी चेहरे दिसले यात अमृता सुभाष, अमेय वाघ, स्मिता तांबे यांसारखे अनेक मराठी कलाकार होते. दुसऱ्या सिझनमध्ये अमेय वाघही छोट्या भूमिकेत होता. अमेयनं ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर सैफ अली खान सोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ज्या वेबसीरिजचा मी सर्वात मोठा चाहता होता त्या वेबसीरिजचा एक भाग होण्याची संधी मिळाली. हा म्हणजे नशीबानं माझ्यासोबत खेळलेला ‘सेक्रेड गेम्स' होता अशा शब्दात अमेयनं आनंद व्यक्त केला आहे. अमेयची या सीरिजमधली भूमिका छोटी आणि खलनायकाची होती.