पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Saaho Box Office Collection: तिसऱ्या दिवशीही कोट्यवधींची कमाई

प्रभास

प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या बहुचर्चित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. समीक्षकांच्या नजरेतून चित्रपटाला फारसे कौतुक झाले नसले तरी प्रेक्षकांमधून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.  बॉक्स ऑफिसवरील चित्रपटाची कमाई मात्र समाधानकारक असल्याचे दिसत आहे. 

...म्हणून कटप्पानं 'बाहुबली'ला मारलं, 'साहो'वर भन्नाट मीम्स

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ७९ कोटींच्या घरात कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २३ कोटींचा गल्ला जमवला होता. हिंदी व्हर्जनमधील 'साहो' २०१९ मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आहे.

..म्हणून पतीसोबत काम करत नाही विद्या बालन

या यादीत 'भारत' चित्रपट अव्वलस्थानी आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४२.३० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या स्थानावर असलेल्या 'मिशन मंगळ' या चित्रपटाने पहिल्या दिवशी २९.१६ कोटींचा गल्ला जमवला होता. 'साहो' चित्रपटासाठी तब्बल ३२० कोटी इतका अवाढव्य खर्च करण्यात आला आहे. प्रभास, श्रद्धा कपूर यांच्यासह नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी आणि चंकी पांडे हे कलाकार या चित्रपटात आहेत.