पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'साहो'मध्ये खलनायकाच्या रुपात चंकी पांडे

साहो

प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा 'साहो' चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. साहसी दृश्य, चित्रपटाचं मोठं बजेट आणि तगडी स्टारकास्ट यामुळे या चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटात दाक्षिणात्य कलाकारांसोबत अनेक बॉलिवूड कलाकारही पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील अभिनेता चंकी पांडेचा पहिला लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. 

...म्हणून राखीनं तिच्या पतीची ओळख गुप्त ठेवली

चंकी पांडे 'साहो' मध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहे. चंकी पांडेचा चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. चंकी व्यतिरिक्त अभिनेता निल नितिन मुकेशही खलनायकाच्या भूमिकेत आहे.

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेला कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा फटका

तेलगू, तामिळ आणि हिंदी  भाषेत हा चित्रपट ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, जॅकी श्रॉफ, निल नितिन मुकेश यांसारखे अनेक बॉलिवूड कलाकारही पाहायला मिळणार आहेत. दक्षिणेतल्या बिग बजेट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे.