पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'साहो'ची प्रदर्शनापूर्वीच ३२० कोटींची कमाई?

साहो

प्रभासचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा 'साहो' चित्रपट या महिन्याच्या अखेरिस प्रदर्शित होत आहे. साहसी दृश्य, दाक्षिणात्य कलाकारांसोबतच बॉलिवूडमधली कलाकारांमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटातील साहसी दृश्यांसाठी सर्वाधिक रक्कम खर्च करण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. 

वादानंतरही तापसी म्हणते कंगना आवडती अभिनेत्री

आयबीटाइम्सच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं ३२० कोटींची कमाई प्रदर्शनापूर्वीच केली आहे. या कमाईत सॅटेलाइट हक्क आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश नाही. तरीही या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच विक्रमी कमाई केली आहे. सॅटेलाइट हक्क, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कमाईचा समावेश केला तर ही कमाई नक्कीच सर्वाधिक असेन असंही म्हटलं जात आहे.

'साहो'चा एकूण निर्मिती खर्च हा ३५० कोटी आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, जॅकी श्रॉफ, चंकी पांड्ये, निल नितीन मुकेश सारखे बॉलिवूड कलाकारही  प्रमुख भूमिकेत आहेत. हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू भाषेतही 'साहो' प्रदर्शित होणार आहे. 

'कुछ कुछ होता है' च्या रिमेकसाठी त्या तीन कलाकारांनाचं घ्यावं, करणची इच्छा
हा चित्रपट सुरूवातीला १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली कारण याच दिवशी बाटला हाऊस आणि मिशन मंगल हे दोन चित्रपटही प्रदर्शित होणार होते. आता प्रभास श्रद्धाचा 'साहो' ३० ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.