बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये गेल्या आठवड्यात बरंच काही घडलं. एका टास्कदरम्यान खेळातील सदस्य परागनं खूप महत्त्वाचा नियम तोडला. राग अनावर झाल्यानं त्यानं नेहाच्या कानशिलात लगावली होती. तर वैशालीसोबतही गैरवर्तन केलं होतं. बिग बॉसच्या घरात कोणत्याही सदस्यावर हात उचलण्यास सक्त मनाई आहे आणि हे बिग बॉसच्या नियमाविरोधात आहे. त्यामुळे परागचं त्वरित खेळातून निलंबन करण्यात आलं.
अमर- प्रेमशिवाय ‘अंदाज अपना अपना’चा सीक्वल अपूर्णच
मात्र बिग बॉसनं परागला घरातील सदस्यांची विशेषत: नेहा, वैशालीची माफी मागायची एक संधी दिली होती. परागला बिग बॉसच्या घरात राहू द्यायचं की नाही याचा पूर्ण निर्णय हा घरातील सदस्यांनाच घ्यायचा होता. अखेर घरातील सदस्यांनी परागला घराबाहेर काढावं हा निर्णय एकमतानं मान्य केला. परागच्या ग्रुपमधील सदस्यांचंही हेच मत पडलं. विषेश म्हणजे रुपालीनंही आपली साथ दिली नाही याची खंत परागनं व्यक्त केली.
वयानं लहान जोडीदार निवडणाऱ्या स्त्रिला म्हातारी म्हणून हिणवतात - मलायका
रुपाली आणि पराग यांच्यातील नातं हे घट्ट होतं. जाता जाता परागनं रुपालीवरच्या आपल्या प्रेमाची कबुलीही दिली. 'मी आता कुठे रुपालीवर प्रेम करू लागलो होतो. पण तिनं मला दगा दिला. ती माझ्या बाजूनं बोलली नाही. किशोरीताई मला खूप जवळच्या होत्या त्याही माझ्याबाजूनं बोलल्या नाहीत. विणा माझ्या पहिल्यापासूनच विरोधात होती.', असं म्हणत पराग भावूक झाला. या शोच्या निमित्तानं मला काही लोकांचे खरे चेहरे कळले, जे मला कधीही कळले नसते, असंही पराग म्हणाला.
रवीना टंडननं झायरा वसीमला सुनावले खडे बोल
पराग हा त्याच्या हातून घडलेल्या चुकीमुळे घराबाहेर गेला आहे. महिन्याभरापूर्वी सुरू झालेल्या या खेळामधून आतापर्यंत मैथिली जावकर, दिगंबर नाईक, विद्याधर जोशी हे सदस्य एलिमनेट होऊन घराबाहेर पडले आहेत. तर शिवानी सुर्वे ही तब्येतीचं कारण देत घराबाहेर पडली आहे. अभिजित बिचुकलेंना गेल्याच आठवड्यात खंडणी आणि चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांनी अटक केली.