पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमल हासन यांच्या 'इंडियन २' मधील दृश्यावर ४० कोटींचा खर्च

इंडियन २

कमल हासन यांचा आगामी चित्रपट 'इंडियन २' चं चित्रीकरण भोपाळमध्ये होणार आहे. या चित्रपटातील एका अ‍ॅक्शन सिक्वेन्ससाठी तब्बल ४० कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून समजत आहे. 

Frozen 2 : पहिल्यांदाच प्रियांका- परिणीती करणार एकत्र काम

शंकर यांच्यासोबत 'एंथरिन' आणि 'आय' चित्रपटात काम केलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते पिटर हेन  या चित्रपटातील अ‍ॅक्शन दृश्यावर काम करणार आहेत.  या दृश्यात २ हजार  ज्युनिअर आर्टिस्ट दिसणार आहेत. २५ दिवस चालणाऱ्या चित्रीकरणासाठी ४० कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती  खात्रीलायक सुत्रांनी दिलीये. 

माझी पत्नी भारतीय आहे, प्रियांकावर निकची स्तुती सुमने

 'इंडियन' हा चित्रपट १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. तब्बल २५ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात कमल हासन यांच्यासोबत सिद्धार्थ, काजल अग्रवाल, रकूल प्रित, प्रिया भवानी शंकर यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.