पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुधाच्या टँकरमधून प्रवास, रितेशनं शेअर केला व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन आहे. एसटी, बसेसे, एक्स्प्रेस, लोकल आणि विमानसेवाही बंद आहेत. सर्वसामान्य लोकांवर प्रवासबंदी आहे. अशातच काही लोक जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत आहेत. अभिनेता रितेश देशमुख यानं सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात लोक दुधाच्या टँकरच्या आतमध्ये लपून प्रवास करताना दिसत आहे. 

कोरोना : सलमान खान संपूर्ण कुटुंबासह राहतोय पनवेलच्या फार्महाऊसमध्ये

हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

प्रवासबंदी असल्यानं अनेक ठिकाणी हातावर पोट भरणारे मजूर चालतच आपल्या गावाकडे निघाल्याचंही दिल्लीसारख्या ठिकाणी समोर आलं आहे. 

Workout चे व्हिडीओ टाकणं बंद करा, बॉलिवूड कलाकारांना दिलजीतचा सल्ला