पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वडील विलासराव देशमुखांवर बायोपिक? रितेश म्हणतो..

रितेश देशमुख

अभिनेता रितेश देशमुख हा लवकरच 'बागी ३' या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला  मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रितेशला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर आधारित बायोपिकसंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर रितेशनं तटस्थ राहून आपले मत मांडले, वडिलांच्या जीवनावर  चरित्रपट यावा असं मलाही वाटतं पण या गोष्टीला अनेक बाजू आहे प्रत्येक बाजूचा विचार केला तर ती  दिसते तितकी सोप्पी गोष्ट नाही असं रितेश म्हणाला. 

विकीवर आयुष्मान पडला भारी !

माझ्या वडिलांचा सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री हा प्रवास  थक्क करणारा होता. अनेकवेळा लोकांनी  त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची स्क्रिप्ट लिहिली आहे,  यावर बायोपिक तयार करण्याबद्दलही मला विचारण्यात आलं मात्र ही सोप्पी गोष्ट नाही, असं रितेशनं सांगितलं. 

मी वडिलांवर बायोपिक काढला तर लोक म्हणतील की मी फक्त एकच बाजू त्यात दाखवली, मी केवळ त्यांची चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला. इतरांनी कोणी यावर चित्रपटाची निर्मिती केली तर त्यातली अनेक तत्थ कदाचित बदलली देखील जातील. मग माझे वडील असे नव्हते किंवा चित्रपटात दाखवलेली अमुक एक गोष्ट घडलीच नव्हती असंही माझं मत होईल. त्यामुळे दोन्ही बाजूंचा विचार करता  माझे वडील विलासराव देशमुख यांच्यावर बायोपिक काढणं म्हणावं तितकं सोप्प आणि सहज नक्कीच नाही. यातून सुवर्णमध्ये निघाला तर मी नक्कीच विचार करेल, पण तूर्त बायोपिकबाबात कोणाताही विचार नाही असंही रितेशनं सांगितलं. 

घरी आलेल्या 'लक्ष्मी'चं शिल्पानं केलं जंगी स्वागत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Riteish Deshmukh hopes to someday make a film on the life of his father Vilasrao Deshmukh