पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी रितेश- जेनेलियाची २५ लाखांची मदत

रितेश- जेनेलियाची पूरग्रस्तांना मदत

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलियानं २५ लाखांची मदत केली आहे. पुरामुळे कोल्हापूर, सांगलीवासीयांचं मोठं नुकसान झालं आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. अनेकांचा संसार उद्धवस्त झाला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत. रितेशनंही मदत कार्यात खारीचा वाटा उचलला आहे. 

महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी बॉलिवूड कलाकारांची मदत का नाही? मनसे चित्रपट अध्यक्ष अमेय खोपकर यांचा सवाल

रितेश आणि जेनेलियानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोघांनीही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाख रुपये मुख्यमंत्री साहय्यता निधीसाठी दिले आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  रितेश आणि जेनेलियाचे आभार मानले आहेत. 

अमोल कोल्हे निर्मित मालिकांचे एका दिवसाचे मानधन पूरग्रस्तांना देणार

रितेशनं ट्विटरवर  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचं आवाहनही देशवासीयांना केलं आहे. पूरामुळे मोठी हानी झाली आहे त्यामुळे प्रत्येकानं मदतकार्यात सहभागी व्हा असं आवाहन त्यानं केलं आहे. रितेशबरोबरच मराठीतील अनेक कलाकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सई ताम्हणकर, सुबोध भावे यांसारख्या कलाकारांनी मदतीचं आवाहन देशवासीयांना केलं आहे.