पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॅन्सरवर मात देऊन ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर परतले भारतात

 ऋषी कपूर परतले भारतात

गेल्या ११ महिन्यांहूनही अधिक काळ अमेरिकेत असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर भारतात परतले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ऋषी कपूर हे कॅन्सवर उपचार घेत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडली असल्यानं ते आईच्या अंत्यसंस्कारासाठीही भारतात आले नव्हते. मात्र आता ऋषी यांची तब्येत सुधारली असून मंगळवारी पहाटे ते  पत्नी नितू कपूर यांच्यासोबत भारतात आले. 

'मोगुल'साठी आमिरचा पुन्हा होकार, गुलशन कुमार यांच्या भूमिकेत

ऋषी कपूर २०१८ मध्ये उपचारांसाठी अमेरिकेत गेले होते. मात्र  कॅन्सरविषयी त्यांनी कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नव्हती. कॅन्सवरचे उपचार संपल्यानंतर ऋषी यांनी चाहत्यांना  प्रकृतीबद्दल माहिती दिली. गेल्या वर्षभरापासून भारतात परतण्यासाठी ऋषी कपूर उत्सुक होते. ११ महिने ११ दिवसांनंतर अखेर भारतात परतलो यासारखं दुसरं सुख नाही, अशा शब्दात ऋषी यांनी आपला आनंद व्यक्त केला.

The Sky Is Pink : मुलीच्या नजरेतून आई- वडिलांच्या 'प्रेमाची गोष्ट'

 ऋषी कपूर यांच्या चाहत्यांनी त्यांचं भारतात स्वागत केलं. ऋषी हे अमेरिकेत वास्तव्यास असताना अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांची भेट घेतली होती. ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर आणि त्याची प्रेयसी  आलिया भट्ट अनेकदा ऋषी कपूर यांच्या सोबत राहायचे.  
ऋषी कपूर यांची तब्येत आता सुधारली आहे त्यामुळे लवकरच ते बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rishi Kapoor finally returned home after spending almost a year in the US for his cancer treatment