गेल्या नऊ महिन्यांपासून अधिक काळ अमेरिकेत वास्तव्यास असलेले ऋषी कपूर हे लवकरच भारतात परतणार आहे. ऋषी कपूर यांना कॅन्सरचं निदान झालं होतं आणि अमेरिकेत ते कॅन्सरवर उपचार घेत होते. कॅन्सर झाल्याची बाब कपूर कुटुंबीयांनी चाहत्यांपासून लपवून ठेवली होती. कॅन्सर बरा होत आल्यानंतर कपूर कुटुंबीयांनी ऋषी यांना कॅन्सर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
अक्षयची चाहत्यांना हात जोडून विनंती
ऋषी कपूर यांना भारत सोडून आता वर्ष होत येईल. आईचं निधन झाल्यानंतर ते अंत्यसंस्कारासाठीही आले नव्हते. त्यावेळी त्यांची प्रकृती अधिक खालावलेली होती. मात्र आपला कॅन्सर पूर्णपणे बरा झाला असून ऑगस्टपर्यंत आपण भारतात परतू अशी माहिती ऋषी कपूर यांनी मुंबई मिररशी बोलताना दिली.
डॉक्टरांनी जर परवानगी दिली तर नक्कीच मी ऑगस्ट महिन्यात भारतात परतेन अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारतात परतेपर्यंत मी १०० % ठणठणीत बरा झालेला असेन असंही ते म्हणाले.
ऋषी कपूर यांच्यासोबत अनेकदा आलिया भट्ट रणबीर कपूर वेळ व्यतीत करतात. मे महिन्याच्या अखेरीस ऋषी कपूर यांनी एक भावनिक ट्विट केलं होतं. मला अमेरिकेत येऊन आठ महिने झाले आता मी घरी कधी जाणार? असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं. यावेळी तुम्ही लवकर बरे होऊन भारतात परताल अशा प्रतिक्रिया देत चाहत्यांनी त्यांच्यांसाठी प्रार्थना केली.